....म्हणून नागपंचमी साजरा करतात तर या महिन्यातील येणाऱ्या सणांना विशेष महत्व प्राप्त असते.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेक जण व्रत-उपासनादेखील करतात. हा श्रावण महिना शिवशंकर महादेवाला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात श्रावणी सोमवारी अनेक जण महादेवाची पूजा-आराधना करतात. तसेच श्रावण महिना हा पवित्र महिना असल्याने नागपंचमी, कृष्णाष्टमी, रक्षाबंधन हे सण ही साजरे केले जातात. यंदा दि .शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नागदेवतेची पूजा आराधना केली जाते.