Type Here to Get Search Results !

नव मतदार नोंदणी अभियानात साडेसहाशे विद्यार्थ्यांचा सहभाग मतदार यादीत नाव नोंदविण्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांचे आवाहन

नव मतदार नोंदणी अभियानात साडेसहाशे विद्यार्थ्यांचा सहभाग मतदार यादीत नाव नोंदविण्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांचे आवाहन
बारामती - बारामती विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित नव मतदार नोंदणी अभियानात कृषी महाविद्यालय, शारदानगर व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, परीविक्षाधिन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप गायकवाड,  प्रा. निरंजन शहा, प्रा.डॉ प्रा. विलास कर्डिले, स्वीप समन्वयक सविता खारतोडे, तलाठी अमोल मारग आदी उपस्थित होते. 

श्री.शिंदे म्हणाले, मतदार यादीत नाव नोंदविण्याकरीता वोटर हेल्पलाईन ॲप किंवा  https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. नजीकच्या मतदार नोंदणी कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. त्यामुळे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे याकरीता नव मतदारांनी मतदार म्हणून २० ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.  

श्री. हरिश्चंद्रे यांनी ‘युवकांची लोकशाहीतील भूमिका व कर्तव्य’ याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नवमतदारांना ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारी मतदार नोंदणी आणि वोटर हेल्पलाइन ॲपविषयी माहिती दिली. मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्र. ६, मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्यासाठी अर्ज क्र. ६ ब, मतदार यादीतून नाव वगळण्याकरीता अर्ज क्र. ७ आणि मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलात बदल, दुरुस्त्या-अद्ययावतीकरण, पत्त्यातील बदल, स्थलांतर, दिव्यांगत्वाचे चिन्हांकन, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी हे तपशील जोडणे, मतदार ओळखपत्र पुन्हा मिळविण्याकरीता अर्ज क्र. ८ अर्ज भरावा, हे अर्ज कशाप्रकारे भरावेत याबाबतही त्यांनी माहिती दिली. 

श्रीमती. खारतोडे यांनी वोटर हेल्पलाईन या ॲपद्वारे मतदार नोंदणी करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test