पत्रकार विनोद गोलांडे यांच्या हस्ते प्रणाली शिक्षण संस्थेचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
सोमेश्वरनगर - भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. बारामतीतील प्रणाली शिक्षण संस्था करंजे येथील भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष तसेच लोकप्रिय दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार विनोद गोलांडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी प्रणाली शिक्षण संस्था संस्थेचे व्हाईस चेअरमन नितीन शेंडकर, माजी सैनिक राजारामतात्या शेंडकर , सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसो लकडे , संचालक संतोष हुंबरे व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते
प्रमुख पाहुणे माजी सैनिक प्रणाली शिक्षण संस्था उपाध्यक्ष नितीन शेंडकर यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विषय माहिती सांगत उपस्थितांना 'स्वातंत्र्य दिनाच्या ' शुभेच्छा दिल्या व आभार संतोष हुंबरे यांनी मानले.