बारामती ! पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी स्वाती ढवाण
बारामती - पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी स्वाती अशोकराव ढवाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पिंपळी गावचे विद्यमान सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी पॅनेलच्या बैठकीत ठरविण्यात आलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.
त्या रिक्त झालेल्या जागेवरती पॅनेलच्या वतीने स्वाती अशोकराव ढवाण यांचा सरपंच पदाचा अर्ज भरण्यात आला होता.
सदरची सरपंच पदाची जागा ही ओबीसी महिला करिता आरक्षित होती.
सरपंच पदाची निवडणूक ही सदस्यांमधून असल्याने ग्रामपंचायतीच्या दोन्ही गटाकडून अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलअधिकारी राजेंद्र गिरमे यांनी घोषित केले.
स्वाती ढवाण ह्या बारामती तालुका जिजाऊ सेवा संघ्याच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्या जिजाऊ सेवा संघ व जिजाऊ बचतगटाच्या माध्यमातून गोरगरीब,गरजू महिला आणि नागरिकांसाठी तालुका व गावामध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात.
त्यांच्या निवडीने पिंपळी-लिमटेक गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पॅनेलच्या वतीने बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक रमेशराव ढवाण, छत्रपती कारखाना भवानीनर संचालक संतोषराव ढवाण, बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे मा.व्हा.चेअरमन भाऊसाहेब भिसे,वकील सचिन वाघ,आबासाहेब देवकाते,हरिभाऊ केसकर,महेश चौधरी, बनकर पाटील,चौधरी,बनसोडे,थोरात,खिलारे,टेंबरे आदींनी समर्थन केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काटेवाडी बीटचे मंडलअधिकारी राजेंद्र गिरमे तसेच पिंपळी गावचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, पिंपळी गावचे तलाठी जगताप आदींनी निवडणूकीचे काम पाहिले व ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.
निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना स्वाती ढवाण यांनी सर्वांना सोबत घेऊन गाव विकासाची कामे व सामाजिक कामे करू अशी ग्वाही दिली.
यावेळी बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेशराव ढवाण,छत्रपती कारखाना भवानीनगर संचालक संतोषराव ढवाण,बारामती खरेदी विक्री संघाचे मा.व्हा.चेअरमन भाऊसो भिसे,वकील सचिन वाघ,पोलीस पाटील मोहनराव बनकर,सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढवाण,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे,पीएमडी डेअरी मिल्कच्या संचालिका दिपाली ढवाण,पिंपळी-लिमटेक विविध विकास सोसायटीचे संचालक अशोकराव देवकाते,कन्हेरी ग्रामपंचायतीचे मा.सरपंच सतीश काटे,पणदरे ग्रामपंचायतीचे सरपंच सत्यजित जगताप,पिंपळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगल खिलारे,सदस्य आबासाहेब देवकाते, राहुल बनकर अजित थोरात,वैभव पवार,उमेश पिसाळ, ग्रामपंचायत सदस्या व मा.सरपंच मंगल केसकर,अश्विनी बनसोडे,मीनाक्षी देवकाते,कोमल टेंबरे,निर्मला यादव आदींसह गावातील प्रमुख हरिभाऊ केसकर,महेश चौधरी,नवनाथ देवकाते,सूर्यकांत पिसाळ,आनंद निंबाळकर,आनंदराव देवकाते,रघुनाथ देवकाते, लालासाहेब लांडे,भानुदास बाबर,लालासो टेंबरे,खंडू खिलारे,रमेश खंडेराव देवकाते,पद्माकांत निकम,नवनाथ यादव,योगिता जाचक,बेगम इनामदार, दिपाली राजगुरू,बाळासाहेब काटे, बाळासाहेब तावरे,संतोष यादव, सहदेव शिंदे,मारुती सूर्यवंशी, रामचंद्र बर्गे,अमोल तावरे, रवी धोत्रे,भाऊसाहेब पवार, विजय बर्गे, विकास पवार,सुनिल पवार आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.