योग्य मार्गदर्शन ध्येय जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच
कृष्णाली अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांची यशाकडे वाटचाल
सोमेश्वसनगर - सातारा जिल्हा फलटण तालुक्यातील साखरवाडीची २०२३मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल आला त्यामधे रेश्मा जाधव हिची जलसंपदा विभागात केनॉल इन्स्पेक्टर पदी निवड झाली. हे पद मिळावे असे रेश्मा हितेश जाधव गायकवाड हिच्या पतीचे स्वप्न होते परंतु २०२० मध्ये पती हितेश जाधव हे अपघाती निधन झाले. आयुष्याचा आधार हरवला. लहान मुलगा अभिराज पुढे काय कसे होईल. सासरी ,सासू, सासरे, दिर तसेच माहेरी नीलेश गायकवाड व निखिल गायकवाड भाऊ व आईवडील या सर्वांनीच खंबीरपणे मागे उभे राहत साथ दिली. सर्वानी तिला अभ्यासाला वेळ दिला.१० वर्षाच्या मुलांच्या शिक्षणाकड़े लक्ष देत अखेर तिने ८ वर्षे केलेल्या संघर्षाला यशाची जोड देत परक्षेत यश मिळाले. केनॉलइन्स्पेक्टर पदी तिची निवड झाली. सातत्य चिकाटी सातत्य असेल तर नक्कीच यश मिळतेच बोलताना रेश्मा म्हणाली.
सदोबाचीवाडी, होळ येथिल गावची पुजा होळकर-कर्चे हिने गेली सातवर्ष तिचा परीक्षेसाठी कुटुंबाची जबाबदारी पेलत पोलीस उपनिरीक्षक पद मोठ्या जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाने मिळवलेल आहे.
अभ्यासात सातत्य ठेवत आणि आई वडिलांचं आशीर्वाद सिद्धार्थ भागवत याने एस आर पी एफ मध्ये यश मिळवत यश संपादन केले
सोमेश्वर परिसरातील मेंढपाळाचा मुलगा आकाश तानाजी ठोंबरे याने देखील अभ्यासाचे सातत्य ठेवत कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असताना देखील जिद्द आणि चिकाटी एकत्र मणी ठेवत अभ्यास केला आणि कृष्णाली अभ्यासिकेचे स्वप्निल गायकवाड यांनी सर्वां बरोबरच मलाही मोलाचे सहकार्य केले गावाकडून सोमेश्वरला हे जा करत असताना आर्थिक परिस्थिती मधी येत होती यावेळेस त्यांनी मोलाचे सहकार्य केले सर्व व्यवस्था त्यांनी केल्याने हे यश सर्वांच्या समवेत मलाही मिळाले आहे असे बोलताना सांगितले त्याची सार्थ निवड एस आर पी एफ पोलीस पदी झाली असल्याचे त्याने सांगितले. कृष्णाली अभ्यासीकेचे स्वप्निल गायकवाड यांनी मिळवलेल्या यशाबद्दल हार शाल पुष्पगुच्छ देत सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.