माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : विविध क्षेत्रात अत्युत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २० सप्टेंबरपूर्वी विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा, साहित्य, संगीत, गायन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार, दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविलेल पाल्य, यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविलेले माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एकरकमी १० हजार रुपये व २५ हजार रुपये रकमेच्या विशेष गौरव पुरस्कार सन्मानित केले जाते.
या पुरस्काराकरीता जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज उपलब्ध असून अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. अधिकाधिक माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे स.दै .(नि.) यांनी केले आहे.
0000