सोमेश्वरनगर - रक्षाबंधन व सलग सुट्ट्या लागून आल्याने विविध जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर, करंजे येथे सोमवार दि १९ रोजी श्रावण मास चालू असल्याने सोमेश्वर शिवलिंग दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या .. दुपारी तीन च्या सुमारास वरून राजाने हजारी लावली होती ,रविवारी रात्री श्रींची अभिषेक व पूजा बारामती तहसीलदार गणेश शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडली यावेळी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत मोकाशी ,सचिव विपुल भांडवलकर, खजिनदार सचिन भांडवलकर व विश्वस्त मंडळ सह करंजे ग्रामपंचायत सरपंच भाऊसो हुंबरे ,करंजेपूल माजी सरपंच वैभव गायकवाड तसेच विविध जिल्ह्यातील आलेले व सोमेश्वर पंचक्रोशीतील शिवभक्त भाविक उपस्थित होते .हॉटेल रेणुका चे मालक महेश सत्तेगिरी व परिवार वतीने शिवलिंग गाभाऱ्यास आकर्ष पुष्प सजावट केली तसेच शिवलिंग दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी खिचडी प्रसादाचे आयोजन संगीता दामोदर खोमणे ,क्षितिजा संग्राम देवकर ,संतोष तुकाराम गायकवाड, सागर बबन लव्हे आणि राजू उफाळे यांच्यामार्फत करण्यात आले तर संध्याकाळ महाप्रसाद कै.आबाजी पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार आंबवडे व सचिन पवार यांच्यामार्फत करण्यात आली .
बारामती आगारा मार्फत यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या होत्या. भाविकांची आरोग्य काळजी साठी होळ आरोग्य केंद्र चे डॉक्टर सह स्टाफ उपस्थित होता, येणाऱ्या दुचाकी चार चाकी वाहनांची प्रशस्त पार्किंगची व्यवस्था तसेच मंदिर परिसरात सर्व सुख सोयी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त असल्याची माहिती सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी दिली.
सोमेश्वर मंदिर परिसरात विविध दुकाने, मिठाई वाले,स्टॉल, हॉटेल ,गृपयोगी वस्तू तसेच विविध प्रकारचे छोटे मोठे पाळणे असल्याने मंदिर परिसर गजबजून गेला होता. सलग सुट्टी असल्याने आलेल्या लहान मुलांनी मनसोक्त खरेदी व पाळण्यात बसण्याचा आनंद मनसोक्त घेतला.