विविध कलर बेल्टस कराटे स्पर्धेत श्रेयांश, सियोन प्रथम
सोमेश्वरनगर : वाणेवाडी (ता. बारामती) येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिग मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने विविध कलर बेल्टसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत येलो बेल्टमध्ये श्रेयांश जाधव तसेच परपल बेल्टमध्ये सियोन गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथे ही स्पर्धा घेण्यात आली. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विक्रम भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. सोमेश्वरनगर परिसरातील कराटेपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. संस्थेचे ब्लॅक बेल्ट मास्टर हर्षवर्धन जगदाळे यांनी कराटेपटूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविणारे कराटेपटू पुढीलप्रमाणे: येलो बेल्ट श्रेयांश जाधव, ऑरेंज बेल्ट-शंभू कांबळे, ओम हरिहर, ग्रीन बेल्ट शारुण गायकवाड, समृद्धी कारंडे, ब्लू बेल्ट खुशिया आतार, पर्पल बेल्ट आदित्य घाडगे, सियोन गायकवाड, सार्थक सकाटे आदी.