Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी

 
पुणे, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कौशल्य विकास विद्यापीठ  यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अशा व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग, संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन सक्षम करुन स्वावलंबनाला या प्रकल्पामार्फत चालना देण्यात येणार आहे.  प्रकल्पाद्वारे व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी सर्वसमावेशक ऑफलाईन व ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून विपणन सहाय्य देण्यात येणार असून आवश्यकता असल्यास इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्यात येईल. या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होणार असून  महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राचे बळकटीकरण होईल. अधिक माहितीसाठी  अमृतच्या महाराजा सयाजीराव  गायकवाड उद्योग भवन, पाचवा मजला, औंध, पुणे-६७ येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test