सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग दर्शन लाखो शिवभक्तांनी घेतले तसेच आज रोजी असलेली कृष्ण जन्म अष्टमीनिमित्त असल्याने भाविकांच्या संकेत मोठी वाढ झाली असून दर्शनासाठी मोठ्या रांगाच्या रांगा दिवसभर लागल्या होत्या.
मध्यरात्रीची स्वयंभू शिवलिंग महापूजा बारामती प्रांत अधिकारी वैभव नावडकर तसेच डी वाय एस पी सुदर्शन राठोड आणि आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. सकापासूनच मंदिर परिसरात आलेल्या शिवभक्तांनी शिवलिंग दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.. दुपारी सोमेश्वर आरती नंतर आलेल्या शिवभक्तांसाठी खिचडी केळी व चिक्की वाटप सिद्धार्थ गीते, मनोहर जगताप ,राहुल कडव, सूर्यकांत गायकवाड, शत्रुघ्न होळकर, पोलीस रमेश नागटिळक ,अनिल खेडकर यांच्यामार्फत देण्यात आली तसेच श्रावणी सोमवार निमित्त सोमेश्वर शिवलिंग गाभारा आकर्षक पुष्प सजावट अमोल चव्हाण माळेगाव यांच्या मार्फत करण्यात आली.
आज रोजी असणाऱ्या गोकुळ अष्टमी निमित्त कै. नंदकुमार घोलप यांच्या स्मरणार्थ घोलप परिवाराकडून आलेल्या शिवभक्तांसाठी मसाले दूध वाटप तसेच
श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले
श्रावण महिन्या मध्ये येणारे शिवभक्तांसाठी होळ आरोग्य केंद्र मार्फत आरोग्यसेवा तसेच सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता मंदिर सजावट, दर्शन रांगांची व्यवस्था तसेच येणाऱ्या मिठाईवाले, खेळणी, पाळणेवाडी, गृह उपयोगी वस्तूंची दुकाने , हॉटेल व्यवसाय यांची व्यवस्था ,दुचाकी चार चाकी वाहनांची सुसज्ज पार्किंग त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अनंत मोकाशी व सचिव विपुल भांडवलकर यांनी बोलताना दिली.