सोमेश्वरनगर प्रतिनिधी:- भारत स्वतंत्र दिनानिमित्त सर्वत्रच ग्रामपंचायत कार्यालय तसेच शाळा महाविद्यालय , विविध संघटना तसेच संस्था कार्यालय येथे गुरुवार दि १५ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला करंजेपुल ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पूजाताई वैभव गायकवाड यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला .
तसेच या कार्यक्रम प्रसंगी सोमेश्वर परिसरातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध पदांवर भरती झालेल्यांचा सन्मान शाल पुष्पहार व सन्मानचिन्ह देत उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच मिरवणूक काढण्यात आली .सत्कारमूर्तीमध्ये नितीन शेंडकर(राज्य राखीव पोलीस दल),गणेश शेंडकर(कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग),शुभांगी हाके व आकांक्षा हुंबरे(कालवा निरीक्षक, जलसंपदा),तन्वी वाघमारे(प्रथम क्रमांक सोमेश्वर विद्यालय),मयुरेश्वर खैरे(तृतीय क्रमांक, सोमेश्वर विद्यालय),चेतन कोळपे व प्रणय खेंगरे(पोलीस नवी मुंबई)
तेजस खेंगरे(पोलीस पुणे शहर) या सर्वांना उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच पूजा गायकवाड, उपसरपंच प्रविण गायकवाड, सदस्य संभाजी गायकवाड, मा. सरपंच वैभव गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, किरण गायकवाड,निवृत्त शिक्षक संभाजी गायकवाड , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल गायकवाड, राजू धुर्वे, दत्तात्रय खैरे, चंद्रशेखर शेलार, सुधीर साळवे, अनिता गायकवाड, आशा शिंदे, हरिश्चंद्र खेंगरे, दशरथ कोळपे, माजी सैनिक बाळासाहेब इंगळे, माजी सैनिक संजय चव्हाण, संजय गायकवाड,मुख्याध्यापक उषा जाधव, सहशिक्षक अशोक कोळेकर, सहशिक्षक इंदुमती वीरकर, ग्रामसेवक सुजाता आगवणे, कर्मचारी श्रीकांत शेंडकर, लक्ष्मण लकडे, योगेश गायकवाड आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.