पुणे - कुणवंत वाणी धर्मशाळा ट्रस्ट (मांगल्य) व शिक्षण समिती सदस्य २०२४ यांच्यामार्फत गिर्यारोहण महाराष्ट्र पुरस्कार देऊन ठाणे पश्चिम येथील सौ मीनाताई वसंतराव माळवदे यांना सन्मानित करण्यात आले.. माळवदे यांनी महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्र ययेथे स्वतः पायी जाऊन यात्रा सुखरूप पणे पूर्ण केली. वयाच्या ६८ व्या वर्षी ही कामगिरी पार पाडल्याबद्दल सर्वांना त्यांचा अभिमान आहे.
मीनाताई माळवदे यांनी हिमगिरी रांगेतील यशस्वी पणे पार पाडलेली तीर्थक्षेत्रे पुढीलप्रमाणे -------
स्वर्गरोहिनी ३१२२ मि.
मनीमहेश हिमाचल प्रदेश १४००० फुट
आधी कैलाश उत्तराखंड १९००० फुट
श्रीखंड कैलाश हिमाचल प्रदेश १९००० फुट
किन्नर कैलाश २०,००० फुट
कैलास मानस सरोवर तिबेट २२००० फुट
अमरनाथ ॐ यमुनोत्री, गंगोत्री,केदारनाथ, बद्रीनाथ , ऋषिकेश ॐ हिमाचल माउंट एवरेस्ट बेस कॅम्प वैष्णोदेवी तसेच महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्र यशस्वी पणे पार पाडले.
गिर्यारोहण चे काम करणाऱ्या ज्येष्ठ समाज भगिनी सौ मीनाताई यांचे अभिनंदन व कौतुक.