सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला दहीहंडीचा थरार
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील शाळेत कृष्णजन्माष्टमी निमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. एकजूट, विश्वास, लक्षावर रोखलेली नजर व फलप्राप्तीचा आनंद अशा या विविध पैलूंचा समावेश असणारी दहीहंडी दरवर्षीच कृष्णजन्माष्टमी निमित्त शाळेत फोडली जाते. शाळेच्या सकाळच्या सत्रात पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी अतिशय जोश पूर्ण वातावरणात दहीहंडी फोडली बाळ गोपाळाने एकमेकांच्या साथीने सहज हंडीपर्यंत पोहोचत दहीहंडीचा सण साजरा केला दुपारच्या सत्रात प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील चार कुलांनी प्रथम मनोरे रचत हंडीला सलामी दिली व सोडत पद्धतीने चारही कुलांना हंडी फोडण्यासाठी बोलण्यात आले शाळेतील वीनस कुलाने पाहिल्याच प्रयत्नात हंडी फोडून विजेता होण्याचा मान पटकावला यावेळी प्राथमिक व माध्यमिक विभागातील मुलींनी कृष्णजन्माष्टमीवर आधारित गीतांवर नृत्याविष्कार सादर केला पूर्व प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी कांची यांनी केले तर प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा मांढरे व सारिका काकडे यांनी केले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.