पोलिसांना राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी, बारामती तालुका युवती संघटना राष्ट्रवादी काँग्रेस यांचा उपक्रम
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मधील बारामती तालुका युवती संघटना यांच्यामार्फत सामूहिकरीत्या अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलिसांना राखी बांधत राखी पौर्णिमा हा सण मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचारी,अधिकारी यांना रक्षाबंधन औचित्य साधत राखी बांधून मंगळवार दि २० रोजी हा सण साजरा करण्यात आला.
बारामती तालुका युवती अध्यक्ष प्रियांका शेंडकर आयोजन केले तर यावेळी युवती उपाध्यक्ष वर्षा शिंदे ,युवती सरचिटणिस काजल शिंदे ,युवती संघटिका सरिता जगताप,महिला कार्यध्यक्ष नुसरत इनामदार,महिला सरचिटणिस सोनाली गायकवाड,महिला उपाध्यक्ष अफसाना पठाण, शहर महिला उपाध्यक्ष स्मिता साबळे ,योगिता शेंडकर ,प्रतिक्षा शेंडकर, पवार ताई उपस्थित होत्या.