इनफॅन्सी किड्स प्ले स्कूलमध्ये ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बारामती प्रतिनिधी- संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो.आपल्या इनफॅन्सी किड्स प्ले स्कूलमध्येही स्वातंत्र्य सोहळा दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाला माननीय श्री. गौरव साबळे सर (डायरेक्टर ऑफ इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल, बारामती) व कु. कीर्ती सरगर मॅडम (शिक्षिका) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री गौरव साबळे सरांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले.
यावेळी मुलांनी विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू- आद्विक दिवेकर, धर्मयुग नालंदे, रुद्रांश वाघे, राजवीर जगताप, लालबहादूर शास्त्री -आरव पवार, आनंदराज साबळे, भगतसिंग- रुद्रांश जाधव ,शिवनीत बोंद्रे, लोकमान्य टिळक- शिवांश मुळे, सावित्रीबाई फुले- मनोरमा खराटमल, वृंदा काटवटे, यशश्री फाळके, झाशीची राणी- नक्षत्रा पाटील, इंदिरा गांधी- भाविका हिवरे, मदर तेरेसा- तनुजा शिंदे, सोल्जर- ऋग्वेद मुसळे, संस्कार पटेल यांचा समावेश होता.
तसेच मुलांनी स्वातंत्र्याविषयी भाषणे सादर केली. यामध्ये सान्वी कांबळे, आरोही चिंचवडकर, राणू दुराफे, नक्षत्रा पाटील, स्वरांजली डोंबाळे यांनी भाषणे केली.
या कार्यक्रमाचे नियोजन स्कूलच्या प्रा. रूपाली खारतोडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. कविता डोईफोडे यांनी केले.अर्चना चांदगुडे, पूनम कळमकर व रेणुका पवार यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.