मिळालेल्या माहीती अशी की, दि.१३/०७/२०२४ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे महीला नामे श्रीदेवी पुरंता मॅगिनमनी वय ४० वर्षे मु पो तोळनुर ता. अक्लकोट जि सोलापुर यांनी मुलगा नामे बसवराज पुरंत मॅगिनमनी हा दि.१०/७/२०२४ रोजी त्याचे मित्रा सोबत घरातुन निघुन गेला होता तो परत घरी आला नाही, म्हणुन त्याची मनुष्य मिंसिग नं १३३/२०२४ अन्वये सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती.
नमुद तक्रारीच्या अनुषंगाने मिसिंग व्यक्तीचा शोध घेणे कामी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथक तसेच वडगाव चौकीचे अधिकारी अंमलदार यांना योग्यत्या सुचना देवुन मिसिंग व्यक्ती हा कोणासोबत घरातुन गेला होता, कोठे गेला होता, या बाबत चौकशी करण्यास सांगितले असताना नमुद इसमाचा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे शोध घेत असताना मिसिंग व्यक्ती नामे बसवराज मॅगिनमनी हा त्याचा मित्र नामे सौरभ बापु रेणुसे रा. मुपो पाबे ता. वेल्हा जि पुणे यांचे सोबत त्याचे गावी गेला असल्याची माहीती मिळाल्याने लागलीस सौरभ रेणुसे यास चौकशी कामी सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे येथे बोलावुन घेवुन त्यांच्याकडे तपास पथकाचे अधिकारी सचिन निकम, सहा पोलीस निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस उप निरीक्षक, व चौकीचे अधिकारी निकेतन निंबाळकर, पोलीस उप निरीक्षक, सुरेश जायभाय, पोलीस उप निरीक्षक, पोहवा उत्तम तारु, सुहास गायकवाड, राजु वेगरे, पोलीस अंमलदार / शिवाजी क्षीरसागर, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे हे त्यांच्याकडे चौकशी करीत असताना सौरभ रेणुसे यांने सांगितले की, बसवराज मॅगिनमनी हा माझ्याकडे दि.१२/०७/२०२४ रोजी मु पो पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे येथे माझ्या गावी आला होता, त्यानंतर तो एक दिवस माझ्याकडे राहीला व दि.१३/०७/२०२४ रोजी रात्रौ ०८/०० वा चे सुमारास मी स्वतः, माझा मित्र नामे रुपेश येणपुरे व मिसिंग व्यक्ती बसवराज मॅगिनमनी असे आम्ही मु.पो. रांजणे, ता वेल्हा जि पुणे चे हद्दीतील डोंगरावर असलेल्या एमएससीबी टॉवरच्या तार चोरी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी बसवराज मॅगिनमनी हा टॉवर वरील तार कट करण्यासाठी वर गेला होता त्यावेळी तो टॉवर वरुन खाली पडला, त्याच्या डोक्यातुन रक्त येवुन लागल्याने आम्ही त्यास उपचारकामी घेवुन न जाता त्यास पाबे घटातील डोंगरावर जंगलामध्ये खड्डा घेवुन गाडुन टाकले आहे, असे सांगितले, त्यानंतर सदर घटने बाबत माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पो.स्टे. पुणे शहर यांना दिली असता त्यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील अधिकारी व पोलीस अंमलदार सांना सौरभ रेणुसे, रुपेश येणपुरे यांनी मिसिँगि व्यक्ती नामे बसवराज
मॅगिनमनी यास ज्या ठिकाणी पुरले आहे त्या ठिकाणाचा शोध घेणे कामी रवाना केले.
त्यानंतर सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार सौरभ रेणुसे व रुपेश येणपुरे यांना घेवुन पाबे घाट, ता. वेल्हा जि. पुणे चे डोंगर भागात शोध घेत असताना सौरभ रेणुसे याने मिसिंग व्यक्तीस पुरलेली जागा दाखवुन दिल्याने स्थानिक पोलीस स्टेशन वेल्हा व तहसिलदार वेल्हा
जि. पुणे यांची मदत घेवुन सौरभ रेणुसे यांने दाखविलेल्या ठिकाणी खोद काम केले असता सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील मिसिंग व्यक्ती बसवराज मॅगिनमनी याची बॉडी मिळून आल्याने सदरची बॉडी पुढील कार्यवाहीकामी ससुण हॉस्पीटल मध्ये पाठविण्यात आली. त्यानंतर मिसिंग व्यक्तीची आई नामे श्रीदेवी पुरंता मॅगिनमनी वय ४० वर्षे मु पो तोळनुर ता. अक्लकोट जि सोलापुर यांनी सौरभ रेणुसे व रुपेश येणपुरे यांचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे येथे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असुन सदरचा गुन्हा पुढील तपास कामी वेल्हा पोलीस स्टेशन, पुणे ग्रामिण यांचेकडे वर्ग केला असुन पुढील तपास वेल्हा पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर मा. रंजणकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.प्रविण कुमार पाटील साो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. संभाजी कदम साो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ३. श्री अजय परमार सोो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री आनंदराव खोबरे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राघवेंद्र क्षीरसागर सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर, पोलीस अंमलदार, सतिश नागुल, सुहास गायकवाड, सचिन गायकवाड, नवनाथ वणवे, शिवाजी क्षिरसागर, राजाभाऊ वेगरे, उत्तम तारु, यांचे पथकाने केली.