नाझरे धरण १०० % भरलेले असून नाझरे धरणात सध्या पाण्याचा येवा सुरू झालेला आहे.
सर्वांना याद्वारे कळविण्यात येते कि, नाझरे धरण १०० % भरलेले असून नाझरे धरणात सध्या पाण्याचा येवा सुरू झालेला आहे.
पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्हा नदीत १६४२.०० क्यूसेक्स इतका विसर्ग सुरु झालेला आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया कर्हा नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. कृपया नदी किनार्यावरील सखल भागातील नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.
नाझरे धरण पूर नियंत्रण कक्ष,
नाझरे(क.प), ता. पुरंदर, जि. पुणे.