सोमेश्वरनगर - चौधरवाडी ( ता.बारामती ) येथे रोगराईला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चौधरवाडी परिसरात धुरळणी करण्यात आली ,वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत वाढ होत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस व सध्या सतत पावसामुळे विविध प्रकारची गवत उगवले असून कचरा,सांडपाणी आणि हवामानातील सततच्या बदलामुळे सर्वत्रच साथीचे रोग आजार यांनी डोके वर काढले आहेत अंगदुखी डेंगू सर्दी-खोकला-ताप डेंगू चिकनगुनिया तसेच पावसाने उगवलेल्या विविध प्रकारच्या गवताने व गाई गोठ्यामध्ये तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेकांना आजार बळावत आहेत . यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही मोहीम राबवली आली.
यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच शशांक पवार व ग्रामसेवक सुनील लोणकर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी बाळासो सावंत, हनुमंत भगत यांनी ही धुरळणी करून घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.