श्रावण महिन्यात सोमायचे करंजे येथील "स्वयंभू सोमेश्वर शिवलिंग" दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र नव्हे तर परराज्यातूनही शिवभक्त भाविक येत असतात...
श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या श्रावणी यात्रेसाठी सज्ज...
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर आहे . श्रावण महिन्यात विविध जिल्ह्यातून लाखो शिवभक्त भाविक सोमेश्वर करंजे येथे स्वयंभू शिवलिंग दर्शन घेण्यासाठी येत असतात, श्रावण यात्रा सोमवार दि ५ रोजी पासून सुरू असून श्री शेत्र सोमेश्वर शिवलिंग दर्शनासाठी शिलवभक्त महाराष्ट्र महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातूनही दर्शनासाठी येत असतात.
श्रावण महिन्या मध्ये येणारे शिवभक्तांसाठी होळ आरोग्य केंद्र मार्फत आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे तसेच सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता मंदिर सजावट, दर्शन रांगांची व्यवस्था तसेच येणाऱ्या मिठाईवाले, खेळणी, पाळणेवाडी, गृह उपयोगी वस्तूंची दुकाने , हॉटेल व्यवसाय यांची व्यवस्था तसेच दुचाकी चार चाकी वाहनांची सुसज्ज पार्किंग व्यवस्था त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अनंत मोकाशी व सचिव विपुल भांडवलकर यांनी बोलताना दिली