Type Here to Get Search Results !

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी...जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक... २ लाख १७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी...जबरी चोरी  करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक... २ लाख १७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
सोमेश्वरनगर-वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची धडाकेबाज कारवाई जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या सराईत २ गुन्हेगारांना अटक. गुन्हयातील एकुन २,१७,००० रू. कि.चा मुददेमाल हस्तगत केली असल्याची माहिती वडगाव पोलीस स्टेशन ने दिली असून घटना आशि की वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे मोढवे ता. बारामती जि.पुणे गावचे हददीतुन उंबरवाडा बालगुडेवस्ती येथुन दि.११/०७/२०२४ रोजी दुपारी ३:३० वा चे सुमारास फिर्यादी संजना कांतीलाल शिंदे रा उंबरवाडा बालगुडेवस्ती मोढवे ता बारामती यांना भोसले वस्ती कोठे आहे, असे विचारून त्यांचे जवळ जावुन साक्षीदार कुसुम बालगुडे यांचे डोक्यात चाकुने वार करून त्यांचे गळयातील मनी मंगळसुत्र हिसकावुन येत असताना त्यांनी प्रतीकार केला असता, त्यांचे उजवे व डावे हातावर परत चाकुने वार केला तेव्हा फिर्यादी या साक्षीदार यांचे मदतीला गेल्या असता आरोपीनी फिर्यादीस देखील चाकुने मारहाण करून तेथुन निघुन गेले बाबत त्यांचेवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. २९१/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (६),६२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुनहयाचे तपासात गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे संशईत इसम नामे 

१) विनोद मारूती नामदास रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे, 
२) रोहीत विनायक जाधव रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे यांना 

ताब्यात घेऊन त्याचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाचे ठिकानावरून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मन्यांची जबरी चोरी केलेचे कबुल केले. त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यातील आरोपी क २ रोहीत विनायक जाधव याने मोढवे गावचे हृददीत सन २०२२ साली जबरी चोरी तसेच वडगाव निंबाळकर गावचे इददीतील सन २०२४ साली निरा डावा कॅनॉलवर इलेक्ट्रीक मोटारची चोरी केलेचे कबुल केले आहे. तरी सदर गुन्हयाचे कामी इसम नामे १) विनोद मारूती नामदास रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे, २) रोहीत विनायक जाधव रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे यांना अटक केली आहे. तरी वरिल आरोपी याचेकडुन खालील जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरी केलेले खालील ३ गुन्हे उघड झाले आहेत.

1) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे जी.आर.एन. 291/2024 IPC. ३०९ (६),६२,३ (५)

२) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. ६३/२०२४ भादवि ३७९ प्रमाणे ३) वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. १६७/२०२२ भादवि ३९४,३४ प्रमाणे तरी वरील तीन गुन्हयात मिळुन सोन्याचे मिनी गंठण, सोन्याची चैन, तीन ग्रॅम सोन्याचे मनी, टेक्स्यो कंपनीची मोटार, व गुन्यात वापरलेली शाईन मोटारसायकल असा एकुन २,१७,०००/- रू मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर इतर पोलीस स्टेशन येथे खलीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. विनोद मारूती नामदास रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे, याचेवर,

१) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. २९१/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (६),६२,३ (५), २) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३२/२०२३भा.द.वि. कलम ३७९, ३) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८७/२०२३भा.द.वि. कलम ३७९, ४) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८९/२०२३भा.द.वि. कलम ३७९, ५) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९०/२०२३भा.द.वि. कलम ३७९, ६) जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९२/२०२३भा.द.वि. कलम ३७९, प्रमाणे मोटारसायकलीचे गुन्हे दाखल आहेत तसेच यातील आरोपी....

रोहीत विनायक जाधव रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे याचेवर,

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन G.R.N. 1) 291/2024 V.N.C. ३०९ (६), ६२, ३ (५) २) गु.आर. क्र. ६३/२०२४ सप्टेंबर ३७९ ३) गु.आर.नं. 167/2022 भादवी 394, 34, 4) गु.आर.नं. 63/2024 भादवी 379, 5) गु.आर.नं. 01/2013 भादवी 379, 6) गु.आर.नं. 142/2013 भादवी 379 7) गु.आर.नं. 144/2013 भादवी 379, 34, 8) गु.आर.नं. 20/2013 ऑगस्ट 379,34, 9) G.R. क्रमांक 183/2012 ऑगस्ट 379,34, 10) G.R.No. 138/2013 भादवी 379,34. 11) गु.आर.नं. 197/2015 भादवी 401, 12) गु.आर.नं. 147/2014 भादवी 379, 13) गु.आर.नं. 130/2013 भादवी 379,411,34, 14) गु.आर.नं. 50/2013 भादवी 379,34, 15) गु.आर.नं. 135/2013 भादवी मोटार चोरीचा पुरावा गुन्हे दाखल झाला.

सदरची कामगिरी ही पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण रमेश चोपडे सो. अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, सपोनि संकपाळ स्था.गु.शा., वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई पांडुरंग कन्हेरे, पो हवा रमेश नागटीळक, महेश पन्हाळे, सागर देशमाने, अमोल भोसले, अनिल खेडकर, पो. ना भाउसो मारकड, हृदयनाथ देवकर, पोशि पोपट नाळे, तसेच राहाफौज बाळासाहेब कारंडे, पोडवा स्वप्नील अहिवळे, पवार, अभिजीत एकशिंगे स्था.गु.शा. पुणे प्रा. यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test