सर्पमित्र कै.विजय यादव ( भाऊ) यांच्या स्मरणार्थ न्यु इंग्लिश स्कूल मधील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप
लोणी भापकर(अविनाश बनसोडे) - बारामती तालुक्यातीललोणी भापकर येथील सर्पमित्र
कै.विजय यादव ( भाऊ) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण च्या निमित्ताने त्यांचे बंधू .निमेश यादव यांनी येथील न्यु इंग्लिश स्कूल मधील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. आपल्या भावाचा समाजकार्याचा वारसा असाच पुढे चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा सहकारी बोर्ड चे संचालक संजय बारवकर, माजी उपसरपंच सुदाम मदने,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज मदने ,दलित पँथर बारामती तालुकाध्यक्ष अविनाश बनसोडे, मुख्याध्यापक संदिप जगताप ,माजी सैनिक विजय गोलांडे, अविनाश गायकवाड, सचिन भापकर, सागर तलवार, तसेच प्रास्ताविक बापू ठोंबरे तर आभार कदम सर यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.