बारामती ! यांत्रिकी भवन येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबाराचा १२० महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
बारामती - महसूल पंधरवडानिमित्त तहसील कार्यालय व मेहता, मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने यांत्रिकी भवन आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिशचंद्रे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, डॉ. विशाल मेहता, डॉ.निकिता मेहता, डॉ.सानिया मुलानी, डॉ.सौरभ तळेकर, डॉ.सौरभ ढाके, रुग्णालयाचे अमर भोसले उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, प्रत्येकांनी दैनंदिन कामकाज करतांना आरोग्याची काळजी घ्यावी. वाढत्या वयानुसार आरोग्य तपासण्या केल्या पाहिजे. आरोग्य सदृढ राहण्याकरीता नियमित व्यायाम करावा, संतुलित आहार घेतला पाहिजे. या आरोग्य शिबाराचा अधिकारी व कर्मचाऱ्यांना निश्चित लाभ होईल, असे श्री. शिंदे म्हणाले.
श्री.भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी २५ टक्के सवलतीमध्ये सुविधा देण्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.
या तपासणी शिबिराअंतर्गत कर्मचाऱ्यांची रक्तदाब, हृदयासाठी ई.सी.जी. उंची,वजन तपासणी,रक्तातील साखरेची पातळी,शरीरातील ऑक्सिजनची पातळी या तपासण्या मोफत करण्यात आल्या.