सोमेश्वर कारखान्याचा नादच खुळा, अनुदानसह तब्बल रु.३,७७१/- ऊसदर जाहिर करणारा ठरला राज्यातील पहिला कारखाना
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३-२०२४ गाळप हंगामाकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति मे.टन रु.३५७१/- उच्चांकी ऊसदर जाहिर केला असून संपुर्ण राज्यात एफआरपीपेक्षा प्रति मे.टन रु.६९७/- जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे. नुकत्याच झ गालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. तसेच कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या जानेवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.७५/-, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.१००/-, मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.१५०/- व तद्नंतर हंगामसंपेपर्यंत तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.२००/- अनुदानासह अनुक्रमे जानेवारीमध्ये तुटलेल्या ऊसास प्र.मे.टन रु.३,६४६/-, फेब्रुवारीमध्ये तुटलेल्या ऊसास प्र.मे.टन रु.३,६७१/-, मार्चमध्ये तुटलेल्या ऊसास प्र.मे.टन रु.३,७२१/- तर मार्चनंतर हंगामसंपेपर्यंत तुटलेल्या ऊसास प्र.मे.टन रु.३,७७१/- चा ऐतिहासीक असा ऊस दर कारखान्याने आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाहिर केल्याची माहिती जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, मागील गाळप हंगाम २०२३- २०२४ मध्ये कारखान्याने एकूण १५,२३,८७६ मे. टनाचे गाळप केले असून बी हेवीसह सरासरी १२.२१ टक्के साखर उतारा राखीत १८,२६,५०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून १०,४९,५१,१३६ युनिट्सची वीजनिर्मिती केली असून ५,८२,१७,६०४ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून १,००,२१,००० लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत ४०,७३,७७३ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. आपल्या सोमेश्वर कारखान्याची सन २०२३-२४ हंगामाची रु.२८७३.९८ प्र.मे.टन इतकी एफ.आर.पी. होती त्यावर कारखान्याने आजअखेर सभासद व बिगर सभासद यांना रु.३,१००/- प्रति मे.टन प्रमाणे रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली होती. पुढील महिन्यामध्ये रु.१००/- ऊस प्रोत्साहन अनुदान हे सभासदांच्या केले जाणार असून उर्वरीत रक्कम ही दिवाळीपुर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडाळाच्या बैठकीमध्ये घेणेत आलेला आहे.
आदरणीय अजितदादा पवार यांचे वैयक्तिक कारखाना प्रशासनावर असणारे काळजीपुर्वक लक्ष व त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन तसेच संचालक मंडळाचे काटकसर व उत्तम नियोजनपुर्व कारभार यामुळे आपला सोमेश्वर सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम राखू शकला. कारखान्याच्या सर्वोच्च ऊसदर देण्याच्या पंरपरेसोबतच संचालक मंडळाने कारखान्याची विस्तारवाढ, को- जनरेशनची विस्तारवाढ पुर्ण केलेली असून लवकरच डिस्टीलरीची विस्तारवाढ पुर्ण करण्याचा
संचालक मंडळाचा मानस आहे.
कारखान्याचे सभासद, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी वाहतूकदार कामगार यांच्या सहकार्यामुळेच सोमेश्वरची घौडदौड यशस्वीरित्या सुरु असून यापुढील काळातही आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.