आजी माजी सैनिक संघटना वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटना वतीने सोमेश्वर येथे १५ ऑगस्ट दिवस तिरंगा ध्वजारोहण श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , आजी-माजी सैनिक संघटना उपाध्यक्ष ज्येष्ठ रामचंद्र शेलार यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला , यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे ,सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय माळशिकारे, उद्योजक दीपक साखरे, उद्योजक राजू दुर्वे,भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे ,पत्रकार युवराज खोमणे, महेश जगताप उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सोमेश्वर परिसरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात चांगले काम करत आहे, कोरोना कालावधी तसेच दरडग्रस्तांना मदत मोठ्या प्रमाणात संघटनेमार्फत केल्याने त्याचे सोमेश्वर कारखाना अध्यक्ष जगताप यांनी त्यांच्या आभार मानत कौतुक केले... सैनिकांविषयी असलेले वाद विवाद त्यांनी परस्पर मिटवण्याल्याने वडगांव निंबाळकर प्रशासन वतीने आभार मानत चांगले काम करू अशी ही ग्वाही कार्यक्रम प्रसंगी सैनिक संघटने वतीने देण्यात आली.
सोमेश्वर पंचक्रोशीत विविध पदांवर भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देत करण्यात आला सत्कार मूर्तीमध्ये, बारामती असोसिएशन अध्यक्षपदी किरण आळंदीकर, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय माळशिकरे , पीएसआय पोलीस सहाय्यक निरीक्षक पदी पांडुरंग कान्हेरे पदोंतरी, नितीन शेंडकर यांची सीआरपीएफ ,पूजा कर्चे - होळकर पोलीस उपनिरीक्षक, पूजा चौगुले पोलीस उपनिरीक्षक, आकांक्षा किशोर हुंबरे, शुभांगी हाके दोघेही कॅनल इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल तसेच , अभियंता रेश्मा गायकवाड , सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज गरदडे या सर्वांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
या वेळी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, उपाध्यक्ष भगवान माळशिकारे , रामचंद्र शेलार, कार्याध्यक्ष नितीन शेंडकर, बाळासाहेब गायकवाड, कोषाध्यक्ष किरण सोरटे, सह कोषाध्यक्ष रवींद्र कोरडे, तक्रार कमिटी अध्यक्ष अँडो.गणेश आळंदीकर,सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसाहेब लकडे, जेष्ठ राजाराम शेंडकर, मोहन शेंडकर, विक्रम लकडे ,राजेंद्र पवार, अशोक रासकर, ताराचंद शेंडकर ,संजय पडवळ ,युवराज चव्हाण, सुधीर चव्हाण
अँडो.गणेश आळंदीकर यांनी आजी-माजी सैनिक संघटनेचा आढावा देत प्रस्तावना केली, अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांनी मानले.