युवा नेते युगेंद्रदादा पवार यांचा बारामती पश्चिम भागाचा मतदार आभार दौरा संपन्न.
विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरात युवकांचे लोकप्रिय नेते युगेंद्रदादा पवार यांचा बारामती तालुक्यातील पश्चिम भागाचा आभार दौरा संपन्न झाला. यामध्ये सदोबाचीवाडी, होळ (८ फाटा), सोरटेवाडी, करंजेपूल, वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, निंबूत, गरदरवाडी, खंडोबाचीवाडी, करंजे, चौधरवाडी इत्यादी गावात जाऊन मतदारांचे आभार मानले. या दौऱ्यामध्ये तरुणांचा उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सहकार्याने नवनवीन उद्योग आणण्याचे व तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलताना युगेंद्रदादा पवार यांनी करंजेपुल येथील सभेत सांगितले. सोमेश्वर परिसरातील विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कारही हार शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ सतीशमामा खोमणे, सदाबाप्पू सातव, राजेंद्रबाप्पू जगताप, बाळासाहेब गायकवाड, प्रशांत बोरकर, प्रदीप शेंडकर, प्रविणदादा भोसले, सागर मदने,अमर पठाण, राजेंद्र गायकवाड, राजू आण्णा लकडे, सुधीर गायवाड, प्रदीप कणसे, केतन भोसले, प्रविण गाडे, संभाजी पाटील होळकर, सुयश सोरटे, प्रदीप शेंडकर,निलेश गायकवाड, किरण गायकवाड, चारुहास शिंदे, विनोद गायकवाड,प्रियांका शेंडकर, सोनाली गायकवाड,वणीता गायकवाड, अंकिता मगर, स्वाती काकडे, घाडगे ताई,सोमनाथ सावंत, हनुमंत जगताप, युगेंद्र भोसले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.