करंजेपुल येथील कु.आकांक्षा किशोर हुंबरे हीची जलसंपदा विभाग सातारा मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदी वर्णी
फोटो ओळ - मिळालेल्या यशाबद्दल आई-वडिलांनी पेढा भरवत आकांक्षा चे अभिनंदन केले.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर करंजेपुल येथील कु.आकांक्षा किशोर हुंबरे ही रहिवाशी असून बारामतीतील सुपा-बोरकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले किशोर हुंबरे सर यांची कन्या आकांक्षा हीची जलसंपदा विभागा सातारा मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदी निवड झाली. तिच्यावर सोमेश्वर परिसरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आकांक्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा करंजेपुल , माध्यमिक शिक्षण सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर, महाविद्यालयीन शिक्षण मु.सा काकडे, सोमेश्वरनगर येथे झाले असून पुढील सिव्हील इंजीनियरिंग विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले.
बारामतीतील सोमेश्वरनगर हे मोठे शैक्षणिक शिक्षण संकुल असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.