डिजिटल मार्केटिंग आणि पॉडकास्ट स्टुडिओ व्यवसायाला वेगळ्या उंची वरती घेऊन जाणारी संकल्पना आता बारामती मध्ये BIDA अध्यक्ष धनंजय जामदार
बारामती - वेगाने विकसित होणाऱ्या बारामती मध्ये आणखी नावीन्य आणण्याचे काम फ्युजन इन्फिनिटी सोल्युशनच्या नवीन अत्याधुनिक पॉडकास्ट स्टुडिओच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे. फ्युजनच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बारामती मध्ये पहिल्या वहिल्या पॉडकास्ट स्टुडिओचे उद्घाटन आधुनिकतेने म्हणजे डिजिटल पद्धतीने करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय जामदार यांचे वक्तव्य. नेहमीप्रमाणे कात्रीद्वारे फीत कट न करता लॅपटॉप वरील बटन ला क्लिक केल्यानंतर आपोआप कट होणाऱ्या फितला पाहून सर्वच जण अवाक झाले.
प्रॉडक्ट लॉन्चिंग, सर्विसेस ची माहिती, जीवन आधारित इंटरव्यू, कंटेंटिव्ह इंटरव्यू, व्यवसायिक यशोगाथा या सर्वांसाठीच पॉडकास्ट चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी अनेकांना पुणे-मुंबई या ठिकाणी जावे लागत असे. आता बारामती मध्येच अत्याधुनिक पॉडकास्ट स्टुडिओ तयार झाल्याने बारामतीकरांना ही एक नवीन संधी मिळणार आहे.
18 ऑगस्ट रोजी बारामती या ठिकाणी या अत्याधुनिक पॉडकास्ट स्टुडिओचे उद्घाटन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे मधील आयव्हीएफ बिजनेस कन्सल्टंट डॉ. मधुर हमीने हे उपस्थित होते त्याचबरोबर अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज बारामतीच्या असिस्टंट प्रोफेसर डॉ. स्मिता खत्री देखील यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजक फ्युजन इन्फिनिटी सोल्युशन्स चे डायरेक्टर किरण पवार, आकाश रामगिर तसेच संपूर्ण फ्युजन टीम यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे निवेदन शेखर ओहोळ यांनी केले तर आभार प्रदर्शन भूषण पवार यांनी केले.