बारामती : मालवण मधील राजकोट किल्ल्यावर युगपुरूष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारावा व या प्रकरणातील दोषी व्यक्तींविरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी संभाजी होळकर, धनवान वदक, राजवर्धन शिंदे, सचिन सातव, सुनिल पवार, पोपटराव गावडे, अविनाश बांदल, अनिता गायकवाड, संजय भोसले, सूर्यकांत पिसाळ, रेहना शेख, रणजित धुमाळ, नितीन आटोळे, तानाजी बांदल, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, वैभव गायकवाड, भरत खेरे, तनवीर इनामदार, साधू बल्लाळ, अँड. बोरकर, अँड नवनाथ भोसले, विजया खटके, रेश्मा ढोबळे, सुरज देवकाते यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्लूयावर उभारण्यात आलेला श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला.