...त्या ग्रामपंचायत सदस्या कडून 'सती मालुबाई मंदिर' कामास 'एक हात मदतीचा' ; परिसरातून कौतुक
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक (पिनु)होळकर पाटील यांनी करंजे - माळवाडी येथील "सती मालुबाई" मंदिरास ३२,००० रुपयांची विट दिली आहे.. याप्रमाणे अनेक व्यक्तींनी मंदिर बांधकाम स विविध स्वरूपाची 'एक हात मदतीचा' म्हणून मदत केली आहे
"सती मालूबाई" मातेच्या भक्तिभवामुळे सोमेश्वर प्रसन्न झाले अशी आख्याईका असून सोरटी सोमनाथाचे प्रति रूप मानले जाणारे करंजेतील सोमेश्वर शिवलिंग असून संपूर्ण महाराष्ट्रात सोमायाचे करंजे हे नावं सुप्रसिद्ध आहे.
या प्रसंगी विद्यमान सरपंच भाऊसाहेब हुंबरे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिनू पाटील, निरा खरेदी विक्री संघ सदस्य बाळासाहेब शिंदे,वीट बांधकाम व्यवसायिक आप्पासाहेब कुंभार उपस्थित होते.
सती मालुबाई मंदिराचे काम चालू असून पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींनी 'एक हात मदती' चा म्हणून मदत करण्यासाठी पुढे यावे.
---- सरपंच -:भाऊसो हूंबरे ----