बारामती नगर परिषद मुख्याधिकारी यांना भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने निवेदन व त्यामधील मागण्या
बारामती नगर परिषद मुख्याधिकारी यांना भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने निवेदन व त्यामधील मागण्या
१) लोकवस्तीत इमारतींवर बसविलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवर तात्काळ काढून टाकावेत.
२) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक याठिकाणी जनरेटर बसविण्यात यावा.
३) सिद्धार्थनगर आमराई येथील राहुल बालवाडी या इमारतीमधील अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करुन दयावी. सदर अंगणवाडीमध्ये स्थानिक रहिवाशांची मुले शिकत आहेत त्यामुळे अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करुन दयावी.
४) सिद्धार्थनगर माता रमाई अभ्यासिका/समाज मंदीर अनंतनगर समाज मंदीर स्थानिकांना वापरण्यासाठी मिळावे म्हणून स्थानिक रहिवाशांची समिती करुन सदर समाज मंदीर समितीकडे हस्तांतर करावे.
५) टी.सी. कॉलेज पाठीमागे प्रगतीनगरकडे जाणारे रस्त्यावर चिंचकर चौक येथे गतीरोधक/स्पिड ब्रेकर बसविण्यात यावे.
सदर वरील विषयांवर तात्काळ करावी झाली नाही तर भारतीय युवा पँथर संघटनेच्यावतीने बारामती नगर परिषद समोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिला आहे.