'जीवनबाग' या स्वलिखीत काव्यसंग्रहाचे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.
नवोदित कवयित्री सौ. अनिता रामलिंग ताबे यांच्या 'जीवनबाग' या स्वलिखीत काव्यसंग्रहाचे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सात जुलै रोजी करण्यात आले. सौ. अनिता ताबे यांचे कुटुंब व 'पंचक्रोशी प्रकाशन, होळ, ता- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन सोहळ्या चे आयोजन केले होते. बारामती येथील ' पाठ्यपुस्तकातील कवी' म्हणून प्रसिद्ध असणारे कवी श्री. हनुमंत चांदगुडे यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.सदर प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. श्री. अविनाश सांगोलेकर, जेष्ठ गझलकार व माजी मराठी विभागप्रमुख,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, यांनी भूषविले. नागपूर येथील जेष्ठ कवी व लेखक, मातोश्री व संताजी प्रतिष्ठान, नागपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. मधुकर स. वाघमारे तसेच पुणे येथील उद्योजक व जेष्ठ सहजयोग साधक श्री. विठ्ठल निंबाळकर प्रमुख सन्मानित अतिथी म्हणून या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी कवयित्री सौ. अनिता ताबे यांचे स्नेही, आप्तेष्ट यांच्या सह साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान कला, विद्यान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. श्री. श्रीराम गडकर, डॉ. श्री. सलीम बागवान तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख
प्रा. श्री. विजय काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.प्रकाशन सोहळ्या सह काही निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन देखील यावेळी पार पडले.आपले काव्य सादर करणार्या सर्व कवींचा पुष्प व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन शब्दरत्न सौ. शुभांगी जाधव, पंचक्रोशी प्रकाशन चे श्री. बाळासाहेब करचे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. शुभांगी जाधव व प्रास्ताविक सौ. अनुप्रिता डांगे यांनी तर आभारप्रदर्शन श्री. रामलिंग ताबे यांनी केले.