वीर धरण विसर्ग:महत्त्वाची सूचना....
वीर धरणाच्या डाव्या काठावरील विद्युत निर्मिती केंद्राच्या ट्रॅश रॅकचे काम स्थगित करण्यात आले आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेल्या ३२ हजार ४५९ क्युसेक्स पाण्याच्या विसर्गात कमी करुन तो काही काळाकरीता २३ हजार १८५ क्युसेक्स करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गात बदल करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण