Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे - बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा २०२४ आयोजन ही स्पर्धा उद्या शनिवार रोजी सोमेश्वरनगर येथुन... या वेळेत बारामती दिशेने जाणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे - बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा २०२४ आयोजन 

ही स्पर्धा उद्या शनिवार रोजी सोमेश्वरनगर येथुन... या वेळेत बारामती दिशेने जाणार 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सर्व नागरिक व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.अजितदादा पवार सो। (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या 65 व्या वाढदिवसाच्यानिमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे यांच्या विद्यमाने पुणे-बारामती राष्ट्रीयसायकल स्पर्धा 2024 शनिवार दि.20 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.सदरची स्पर्धा ही शनिवार वाडा पुणे येथून सकाळी 8:30 वा. सुरू होणार आहे. सायकल स्पर्धेचा मार्ग पुणे-हडपसर-सासवड-जेजुरी-निरा मार्गे बारामती तालुक्यातून सकाळी 10:00 वा.निंबूत मार्गे करंजेपूल-होळ 10 फाटा-वडगाव निंबाळकर-पणदरे-माळेगाव बु-कसबा-इंदापूर चौक-भिगवण चौक ते विद्या प्रतिष्ठान पर्यंत जाणार आहे.
    याप्रसंगी आपल्या गावातील व शहरातील सर्व विद्यार्थी,ग्रामस्थ,युवक,महिला व मान्यवरांनी त्या स्पर्धेसाठी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून प्रोत्साहन देऊन स्वागत करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.
       तसेच स्पर्धा पार पडल्यानंतर दुपारी 1:30 वा. गदिमा सभागृह विद्या प्रतिष्ठान,विद्यानगरी बारामती या ठिकाणी बक्षिस वितरण समारंभ आयोजित केला असून त्यासाठी मा.खा.सौ.सुनेत्रावहिनी पवार सो| , मा.ना.कु.आदिती तटकरे सो| (महिला बालकल्याण मंत्री) , मा.पैलवान अमोल लंके (सिने अभिनेता) , मा.ना.दत्तात्रयमामा भरणे, मा.जयदादा पवार (युवा नेते )  इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वांनी ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा यशस्वी करावी हीच विनंती. 

               

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test