उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वरनगर ...या कॉलेजचे तीन शिक्षक गेले तीन वर्ष पुणे- बारामती सायकल रॅली पूर्ण करतात.
सोमेश्वरनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे - बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजन दर वर्षी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे यांच्या विद्यमाने पुणे-बारामती राष्ट्रीयसायकल स्पर्धा आयोजित करण्यात येत असते स्पर्धा ही शनिवार वाडा पुणे येथून सकाळी सुरू होते तर या सायकल स्पर्धेचा मार्ग पुणे-हडपसर-सासवड-जेजुरी-निरा मार्गे बारामती तालुक्यातून.निंबूत मार्गे करंजेपूल- होळ 10 फाटा-वडगाव निंबाळकर-पणदरे-माळेगाव बु-कसबा-इंदापूर चौक-भिगवण चौक ते विद्या प्रतिष्ठान पर्यंत जात असते
याप्रसंगी सायकल स्पर्धेच्या मार्गावरील सर्वच गावातील व शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ,युवक,महिला स्पर्धेसाठी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून प्रोत्साहन देऊन स्वागत करत असतात.
गेले तीन वर्ष या सायकल स्पर्धेसाठी भाग घेणारे व प्रथम क्रमांकाची अपेक्षा न ठेवता केवळ पुणे ते बारामती सायकल स्पर्धा पूर्ण करणे हा त्यांचा अट्टाहास असतो... ते बारामतीतील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळातील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रो.राहुल कदम , प्रो अंकुश पवार , प्रो एस जी बनकर हे तीन शिक्षक आहे त्याचे कौतुक म्हणून विद्यार्थी हे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी थांबत असतात व गेट समोर आल्यानंतर त्यांना शुभेच्छा व सत्कारही करण्यात येतो यावेळेस त्यांचा सत्कार ज्येष्ठ कर्मचारी वसंत तांबे यांच्या हस्ते करण्यात आला
या प्रसंगी श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप तसेच सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे व संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर यांनी तिन्ही शिक्षकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.