करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम जयदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न.
सोमेश्वरनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जयदादा पवार यांनी करंजेपूल (ता बारामती) येथे शनिवार दि.२७ रोजी भेट दिली.यापूर्वीच करंजेपूल ग्रामपंचायतीच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्य व मार्गदर्शनातून एक कोटी तीस लाख रुपये निधी मंजूर केलेला असल्याची माहिती करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड यांनी जयदादा पवार यांना दिली तसेच आज रोजी करंजेपूल ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजनही जयदादांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी करंजेपूल ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पूजाताई गायकवाड यांनी करंजेपूल येथील चालू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.
या कार्यक्रम वेळी गव्हर्नमेंट काॅन्ट्रॅक्टर दिग्विजय मगर,माजी लोकनियुक्त सरपंच वैभवराव गायकवाड,वाघळवाडी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तुषार सकुंडे,दादू मांगडे, तुषार लोखंडे व करंजेपूल ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकनियुक्त माजी सरपंच वैभव गायकवाड यांनी जयदादांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे आभार मानले.
ज्या विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे ती कामे पुढीलप्रमाणे....
१) करंजेपूल येथील मासाळसरांचे घर ते सापेतकीचा ओढा भुमीगत गटार करिता दहा लाख रुपये
२) करंजेपूल येथील सुरेश गायकवाड यांचे घर ते निरा बारामती रस्त्याला जोडणारा अंतर्गत रस्ता करिता पंधरा लाख रुपये
३) करंजेपूल अंतर्गत फुले नगर येथील अंतर्गत रस्ता करिता दहा लाख रुपये
४) करंजेपूल येथील खरा मळा ते सुभाष गायकवाड वस्ती रस्ता करिता दहा लाख रुपये
५) करंजेपूल येथील कुणाल गायकवाड घर ते राकेश पाटोळे घर अंतर्गत गटार योजना करणे त्यासाठी दहा लाख रुपये
६) करंजेपूल येथील नितीन यादव यांचे घर ते सुशील ठोसर यांचे घरापर्यंत सिमेंट काॅक्रीट रस्ता करणेसाठी पांच लाख रुपये
७) करंजेपूल येथील जनार्धन सावळकरांचे घर ते राहुल बालगुडे यांचे घरापर्यंतच्या सिमेंट काॅक्रीट रस्त्या करिता दहा लाख रुपये
८) अंतर्गत रस्ता करणे वीस लाख रुपये
९) शिंदे वस्ती रस्ता करणेसाठी वीस लाख रुपये
१०) करंजेपूल येथील अंतर्गत गटार लाईन करणेसाठी वीस लाख रुपये अशी सविस्तर विकास कामाची माहिती लोकनियुक्त सरपंच.पूजाताई गायकवाड यांनी दिली.त्यांनी आपल्या मनोगतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामाची घोडदौड चालू असल्याचे नमूद केले.