मुढाळे येथे वृक्षारोपण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा
मुढाळे प्रतिनिधी : मुढाळे (ता. बारामती) येथील सोमेश्वर विद्यालयात मंगळवारी (दि.२३) विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वृक्षारोपण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
अभिजित वाबळे व अक्षय कदम मित्रपरिवार यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून व राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते १०० झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच तात्याबा ठोंबरे, निरा मार्केट कमिटी संचालक शरयु वाबळे, पंचायत समिती माजी सभापती मनोहर वाबळे, शहाजी निंबाळकर, लखन दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.