सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात वाहतूक नियमांविषयी जाणीव जागृती
सोमेश्वरनगर - बारामती तील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालय व महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमान अभिजीत काकडे देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे ,सचिव सतीशराव लकडे, महालक्ष्मी ड्रायव्हिंग स्कूल चे मॅनेजर हेमंत लोंढे. व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.सुजाता भोईटे, शिवाजी काकडे उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी सर्वांचे स्वागत केले, तसेच विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व आपल्या हातून कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी.
यावेळी अभिजीत काकडे- देशमुख यांनी आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शिस्त असणे गरजेचे आहे. तसेच कोणासाठी थांबायचं नाही आणि कोणाला थांबायला लावायचं नाही आणि आयुष्यामध्ये चुकायचे नाही आणि सॉरी म्हणायची वेळच येणार नाही असं जीवन जगलं पाहिजे. तसेच माफ करण्याची वृत्ती आपल्या मनामध्ये बाळगणे गरजेचे आहे.
यावेळी या कार्यशाळेचे प्रमुख . हेमंत लोंढे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमा विषयी व्हिडिओ ऑडिओ माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तराज जगताप यांनी केले व आभार पर्यवेक्षक राहुल गोलांदे यांनी मानले.