वीर धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात होणारा सोमवार रोजीचा विसर्ग १३ हजार ९११ क्यूसेक
वीर धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात होणारा विसर्ग सोमवारी पहाटे ३.३० वा. १३ हजार ९११ क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत-कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग फलटण