सामाजिक बांधिलकी जपत बहुजन समाजसेवा संघ वतीने वाचनालय येथे वृक्षारोपण.
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वरनगर करंजे येथे बहुजन समाज सेवा संघ नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात झाडे लावा झाडे जगवा या अनुषंगाने संघ वतीने वाचनालय समोर वृक्षारोपण करण्यात आले तसेच सदस्य अजित पाटोळे यांच्यावतीने वाचनालय कॉम्प्युटर संच भेट देण्यात आला याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी बहुजन समाजसेवा संघ संस्थापक अध्यक्ष पोपट हुंबरे, करंजे ग्रामपंचायत सरपंच भाऊसो हुंबरे , उपसरपंच मयुरी गायकवाड, खुर्शीदा मुलानी, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे, श्री सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे , एस एस गायकवाड , माजी पीएसआय प्रकाश हुंबरे चंद्रकांत होळकर, करण हुंबरे , सोमनाथ पाटोळे सह इतर मान्यवर उपस्थित होते.