बारामती ! राजेंद्रबापू जगताप यांची आंंत्रप्रेनर्स इंटरनॅॅशनल क्लब बारामती (पुणे) चे अध्यक्षपदी निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावचे राजेंद्रबापू जगताप यांची आंंत्रप्रेनर्स इंटरनॅॅशनल क्लबचे अध्यक्षपदी निवड झाली. ते गेले ३२ वर्ष औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यावेळी ज्ञानेश्वर फराटे यांची उपाध्यक्षपदी व बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांची सेक्रेटरी पदी तसेच राजेंद्र फडतरे यांची खजिनदार पदी निवड करणेत आली
आंंत्रप्रेनर्स इंटरनॅशनल गेल्या ३२ वर्षापासून उद्योग प्रगतीसाठी कार्यरत आहे. संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट, सभासदांमध्ये, तसेच विशेषत: तरुण आणि महिलांमध्ये उद्योजकता विकसित करणे आणि समाजात औद्योगिकीय संस्कृतीचा प्रसार करणे हे आहे. तर उद्योजकता विकास नेटवर्किंग शिक्षण आणि प्रशिक्षण संशोधन आणि विकास, मार्केटिंग आणि प्रमोशन प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय सहकार्य, स्टार्ट अप्स यांना मार्गदर्शन करणे आणि सहकार्य करणे यासाठी ही संस्था सक्रिय आहे.
राजेंद्रबापू जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष आहेत. तालुक्यात पवार साहेबांचे निष्ठावंत समर्थक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचा सहकारी साखर कारखान्याचा सुद्धा चांगला अभ्यास आहे. ट्रान्सफॉर्मर रिपरर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ट्राम) या संघटनेचे ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत.
याप्रसंगी उद्योजक सचिन माने, बारामती चेंबरचे कार्यध्यश दत्ता कुंभार, राजेंद्र साळुंखे, प्रदीप कांबळे, नरेश तुपे, शाहजी रणवरे, सुनील गोळे, मनोहर गावडे, संजय थोरात इत्यादी उद्योजक उपस्थित होते.