Type Here to Get Search Results !

'सोमेश्वर 'येथे आजी-माजी सैनिक संघटना वतीने 'कारगिल विजयी दिवस' वृक्षारोपण करत साजरा..वीर पत्नी तसेच नवनिर्वाचित व सेवानिवृत्त यांचा सन्मान

'सोमेश्वर 'येथे आजी-माजी सैनिक संघटना वतीने 'कारगिल विजयी दिवस'  वृक्षारोपण करत साजरा..

वीर पत्नी तसेच नवनिर्वाचित व सेवानिवृत्त यांचा सन्मान

सोमेश्वरनगर प्रतिनिधी - कारगिल विजय दिवस हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्वाचा दिवस आहे. भारतात २६ जुलै  हा दिवस साजरा केला जातो. भारत  आणि पाकिस्तानमध्ये १९९९ साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण ६० दिवस चाललं. २६  जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी  घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या  सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर तालुका बारामती ही संघटना नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते अशी त्यांची बारामती तालुक्यात ओळख आहे तसेच २६ जानेवारी या १५ ऑगस्ट तसेच कारगिल विजयी दिवस  दरवर्षी साजरा करत असतात.

शुक्रवार दिनांक २६ जुलै कारगिल विजय दिवस वर्ष 25 वे हा   कारगिल विजय दिवस आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने संघटना कार्यालय येथे शहीद जवानांना आदरांजली वाहत तसेच वृक्षारोपण करत साजरा करण्यात आला.
  वीर पत्नी सेवानिवृत्त व नवनिर्वाचित  सदस्यांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ देत करण्यात आला यावेळी करंजेपुल लोकनियुक्त सरपंच पूजाताई गायकवाड , उपसरपंच शेखर गायकवाड, करंजे सरपंच भाऊसो हुंबरे, करंजेपुल, माजी सरपंच वैभव गायकवाड , शिवाजी शेंडकर, कैलास बापू मगर,भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे
तसेच आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,उपाध्यक्ष भगवानराव माळशिकारे, कायदेशीर सल्लागार अँड. गणेश आळंदिकर , कार्याध्यक्ष नितीन शेंडकर , बाळासाहेब गायकवाड,सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसो लकडे सह, ताराचंद शेंडकर,विकास साबळे ,राजेंद्र पवार, मोहन गायकवाड, भरत मदने, युवराज चव्हाण, नामदेव गडदरे प्रतिष्ठान अध्यक्ष अध्यक्ष संतोष गरदडे, वीर पत्नी  उषा  गरदडे, वीर पत्नी सुळ मॅडम, स्वातंत्र्य  सैनिक वीरपत्नी हिराबाई दादू हुंबरे सह  आजी माजी पदाधिकारी उपस्थित असतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test