श्री सोमेश्वर मंदिर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस मोठे उत्साहात साजरा
श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस करतात साजरा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री, तथा कार्यक्षम अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी सोमवार दि २२ जुलै२०२४ रोजी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सोमेश्वर शिवलिंग पूजा व महारूद्रा अभिषेक करण्यात श्री सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच केक कापण्याचा कार्यक्रम सोमेश्वर मंदीर करंजे येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री सेवाभावी संस्थेचे सुखदेव शिंदे सह सर्व सदस्य,. श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत मोकाशी सह विश्वस्त मंडळ तसेच सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध संस्थाचे पदाधिकारी, आजी माजी ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, सदस्य तसेच बहुसंख्य कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.