श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने माळेगाव येथील गरजू विद्यार्थिनीला 'एक हात मदतीचा'
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील श्री सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक गरजू विद्यार्थ्यांना _एक हात मदतीचा' असा उपक्रम राबवत असतात , काही दिवसांपूर्वीच सोमेश्वर भाग शाळा करंजे येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले असता व बातमी प्रसारित झाली असता या अनुषंगाने माळेगाव येथील एका गरजू विद्यार्थिनी ने संपर्क साधला असता व याची दखल घेत माळेगाव येथील आर्य संतोष शिंदे इयत्ता नववी मध्ये शिकत असलेली आणि तिचे वडील कोरोनाच्या काळात निधन पावल्याने तिची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने 'एक हात मदतीचा' म्हणून शालेय साहित्य देत मदत करत एक सामाजिक उपक्रम राबवला आहे.
याप्रसंगी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे, श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत मोकाशी , सोमनाथ देशमुख, भाऊ गोरे ,बाळासाहेब चौधरी तसेच भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे उपस्थित होते.