वाणेवाडी येथे लोकनियुक्त खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर ; १११ बॉटल रक्त संकलन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
लोकनियुक्त खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीराव भोसले सहकार संकुल,वाणेवाडी ( ता बारामती) येथे भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले आले होते, यामध्ये एकूण १११ बॉटल रक्त संकलन झाले.
या रक्तदान शिबिरात युवकांनी मोठा प्रतिसाद लाभला तसेच वाणेवाडी, मुरूम ,करंजेपूल , करंजे सोमेश्वर परिसरातून 'रक्तदान श्रेष्ठदान' असल्याने या उपक्रमास अनेकांनी हातभार लाभल्याने यामध्ये एकूण १११ बॉटल रक्त संकलन झाले. यामध्ये अक्षय ब्लड बँक पुणे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रम प्रसंगी वाणेवाडी येथील उपस्थित मान्यवरांनी किशोर शेळके, रमेश कदम व महम्मद शेख यांची महाराष्ट्र राज्य मानधिकार फाउंडेशन विविध पदांवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रविणदादा भोसले यांनी केले तर या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष चे एस एम बापू जगताप , सतीशमामा खोमणे, राजेंद्रबापू जगताप,प्रशांत बोरकर, संदीप गुजर, एडवोकेट राजेंद्र काटे ,अमितनाना तावरे ,अजिंक्य वाघमोडे, प्रदीप कणसे,बुवासाहेब हुबरें ,गोरे ,प्रदीप शेंडकर, सागर मदने ,निलेश गायकवाड,राजेंद्र गायकवाड, विनोद गायकवाड ,सुधीर गायकवाड , सोमनाथ सावंत सह प्रियंका शेंडकर, निलम काकडे, नुसरत इनामदार सह सर्वच पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयोजक प्रवीण दादा भोसले प्रमुख शिवाजीराव यशवंतराव भोसले प्रतिष्ठान वतीने उपस्थितांचे आभार मानले.