सार्वत्रीक निवडणूक २०२४ चा निकाल आज मंगळवार रोजी जाहीर होणार असुन त्या अनुषंगाने कोणीही नागरिक गैरवर्तन, मन धुखवतील,सामजिक तेढ व्यक्तव्य करू नये - दर्शन दुगड
वॉटसअप ग्रुप चे ऍडमीन दि.....कालावधीमध्ये त्यांचे ग्रुपचे सेटिंग मध्ये only admin करुन बदल करावा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे वतीने आवाहन करण्यात येते की ....सार्वत्रीक निवडणूक 2024 चा निकाल दि. 04/06/2024 रोजी जाहीर होणार असुन त्या अनुषंगाने आपणास कळवीण्यात येते की, कोणीही नागरीक सदर निवडणुक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मिडीयाच्या द्वारे फेसबूक, इन्टाग्राम, वॉटसअँप ग्रुप व ईतर तत्सम अप्लीकेशन च्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या जातीच्या, धर्माच्या, धार्मीक भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, डिजीटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करु नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करु नये, डिजे/बँजो/ अथवा कोणतेही वाद्य वाजवनार नाहीत, फटाके फोडणार नाहीत, तसेच विना परवाना विजयी मिरवणुक काढू नये. तसेच वॉटसअप ग्रुप चे ऍडमीन यांनी दि. 03/06/2024 ते दि. 05/06/2024 या कालावधीमध्ये त्यांचे ग्रुपचे सेटिंग मध्ये only admin करुन बदल करुन घ्यावा, जेणेकरुन ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. जर अडमीन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ऍडमीनला जबाबदार धरुन योग्य ती कायदेशी कार्यवाही करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
कळावे,
दर्शन दुगड(भा.पो. से.)
प्रभारी अधिकारी
वडगाव निंबाळकर पो स्टे.