Happy Birthday( ३०जुन ) : संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे.
प्रथम संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सुप्रियाताई सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची एकुलती एक कन्या असलेल्या सुप्रियाताई सुळे यांचा प्रवास समाजकारणापासून सुरु झाला.
समाजाच्या उपेक्षित घटकांसाठी काम करण्यास त्यांनी सुरुवात केला. महिलांवर त्यांचा प्रारंभापासून भर राहिला. महिलांच्या व्यथा जाणून घेत त्या वर उपाययोजना व्हाव्यात या साठी सुरवातीपासून मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांशी त्या सतत संवाद साधत राहिल्या, पाठपुरावा करत राहिल्या.तसेच राजकीय वारसा व परंपरा पाठीशी असली तरी कष्टाला पर्याय नसतो, आपल स्थान निर्माण करायच असेल तर जिद्द व चिकाटी जोडीला असावीच लागते, ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवून दिली आहे. एक मोठी राजकीय परंपरा असलेल्या कुटुंबबातून येऊनही त्यांनी राजकारणातही कष्टाला पर्याय नसतात हेच सिध्द केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात त्या पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरतात. लोकसभा मतदारसंघ हा मोठा असतो. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला या सारख्या मतदारसंघातील प्रत्येक गाव व वाडीवस्ती ते जात विविध प्रश्न मार्गी लावतात यामुळे ते लोकप्रिय खासदार म्हणून सर्व मतदारसंघात लोकप्रिय आहेत.