तालुक्यातील सेतू चालकांकडून सामान्य जनतेची लुट- शिवसेना प्रमुख श्रीनाथ ननवरे
दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम
दाैंड तहसीलमध्ये सेतुच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची लुटमार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिवसेना गटाचे दाैंड शहर प्रमुख श्रीनाथ माणिक ननवरे यांनी दाैंडच्या तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनाच्या माध्यमातून दाैंड तहसीलमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी शासनाने सुरु केलेल्या सेतू कार्यालयातून अव्वाच्या सव्वा फी आकारली जात असल्याबाबतच्या चर्चा सुरू असल्याने हा सर्व प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे.
संबंधित सेतूमध्ये काम करण्यासाठी विचारणा केली असता आम्हाला तहसीलदार व इतर अधिका-यांना पैसे द्यावे लागतात.असे सांगण्यात येते.किंवा जाणिवपूर्वक बाहेरच्या इतर खाजगी सेतूमध्ये जाण्यास भाग पाडले जाते.
एकंदरीत दाैंड सेतू मधून हाेणा-या लुटमारीच्या भाेंगळ कारभाराकडे तहसिलदारांचे दुर्लक्ष असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.याबाबतीत दाैंडच्या तहसीलदारांनी लक्ष्य घालून सर्व सामान्यांची हाेणारी लुटमार थांबवावी.अशा आसयाचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.