'करंजे'चे सुपुत्र पुणे येथील पी एस आय सुरेश रासकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न.
'पर्यावरण दिन'औचित्य सादत एक वृक्ष भेट देत सामाजिक उपक्रम राबविला.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-
बारामतीतील करंजे रासकरमळा येथील रहिवासी आणि पुणे पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले सुरेश रासकर यांनी आपल्या ३२ वर्षे पोलिस दलातील सेवेतून सेवानिवृत्त झाले, अतिशय गरीब व कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी १९९२ मध्ये पोलिस शिपाई पदावर रुजू झाले होते. त्यांना ३२ वर्षांच्या सेवेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.करंजेगावं च नव्हे तर सोमेश्वर परिसरात एक मनमिळाऊ, सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. नातेवाईक, परिसरातील नागरिकांनी त्यांचा बारामती तालुक्यात प्रसिध्द असलेले वाघळवाडी येथील रेणुका हॉटेल च्या दिमाखदार हॉल मध्ये य सेवापूर्ती सोहळा आयोजित नुकताच पार पडला.
या सोहळा प्रसंगी अनेकांनी पी एस आय सुरेश रासकर यांच्या पोलीस दलात सेवेत असताना केलेली मदत व अनुभव गणेश फरांदे ,मोहन ओझर्डे ,दत्तात्रय फरांदे महाराज तसेच सुनिता अमोल फरांदे यांनी व्यक्त करत त्यांना पुढील आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपत ...आरोग्यदायी व भरभराटीचे जाओ आशा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सेवापूर्ती दिवशी आलेला त्यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने असा दोन्ही सोहळ्याचे व 'पर्यावरण दिन' औचित्य साधत त्यांनी आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींना फळझाड आंबा व चिक्कू असे वृक्ष भेट देण्यात आले आणि एक सामाजिक उपक्रमही राबवला असल्याने रासकर यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे संतोष रासकर सूत्रसंचालन संतोष रासकर यांनी केले तर आयोजन अमोल फरांदे व प्रमोद फरांदे यांनी केले तर उपस्थितांचे आभारही मानले.