सोमेश्वरनगर ! मु. सा. काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
सोमेश्वरनगर :- बारामती तालक्यातील मु. सा. काकडे महाविद्यालयात शुक्रवार दि २१ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात राष्ट्रीय योग प्रशिक्षक , फिटनेस ट्रेनर , लेखक विवेक पाटील यांनी उपस्थित शिक्षक , विद्यार्थी , शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी फक्त आसने व प्राणायाम करणे म्हणजे योग नव्हे तर योगा मध्ये ध्यान , धारणा , योगा , आसने , प्राणायाम आशा आनेक गोष्टींचा समावेश होतो असे सांगितले. योगाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. रोज रोज केल्याने शारीरिक , मानसिक आजार दूर होतात . सध्याच्या ताणतणाव जीवनशैलीसाठी माणसाला दररोज योगा करणे अतिशय फायदेशीर आहे. कारण वाढता ताणतणाव व सुखी जीवनशैली मुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांवर योगामुळे मात करता येते या करिता त्यांनी व्यायामाची व आसनाची प्रात्यक्षिके दाखवून कोणत्या आसणाने कोणत्या आजारावर मात करता येते हे सांगितले. जीवनामध्ये तंदुरुस्त राहणे किती आवश्यक आहे . त्यामुळे योगासने केल्याने शरीर मजबूत होते . योगा मुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते व कामामध्ये एकप्रकारे सुलभता येण्यास योगामुळे मदत होते .
विवेक पाटील सर यांनी प्रात्यक्षिक करून आसनाचे , प्रानायमाचे आरोग्यावर व जीवनात होणारे फायदे याबाबत उपस्थितांना मारगदर्शन केलें . कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्यांनी चालुवर्षी महिलांना केंद्रबिंदू ठेवून महिला सक्षमीकरणासाठी योग आशी आंतरराष्ट्रीय योगदिनाची थीम आहे असे सांगितले त्याचबरोबर भारताने योग ही जगाला दिलेली मोठी देणगी आहे असे सांगतानाच सर्वांनी आपल्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन दररोज नियमितपणे योगासने करावीत आसे उपस्थितांना आवाहन केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सतीश लकडे यांच्यासह सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उस्फूर्त सहभाग घेतला . आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजित काकडे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले व प्रा. दत्तराज जगताप , डॉ. श्रीकांत घाडगे, प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे-देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.