'सोमेश्वर ' परिसरात पावसाची दमदार एंट्री
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमेश्वर भागात पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे... काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात असलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. आकाशात पावसाळी ढगांची गर्दी दिसत हाेती परंतु पाऊस कधी पडणार या प्रतिक्षेत शेतकरी नागरिक होते गुरुवारी सायंकाळी पाच च्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह सोमेश्वर परिसरातील करंजे, देऊलवाडी, रासकरमळा, माळवाडी ,चौधरीवाडी ,करंजेपुल, सोरटेवाडी, वाकी, चोपडज, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम ,निबुत जाेरदार पावसाला सुरुवात झाला त्यामुळे नागरिकांची उकाडयापासून सुटका झाली तर रात्रीच्या वेळी जोराच्या झालेल्या पावसाने शेतात तसेच रस्त्यालगत पाणी पावसाचे पाणी साठले आहे.काही दिवस का होईना शेतातील उभ्या पिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने शेतकरी वर्ग मध्ये समाधान आहे.